Fri, Jul 19, 2019 20:27होमपेज › Kolhapur › कागल पंचायत समितीचे सदस्य जोती मुसळे अपात्र

कागल पंचायत समितीचे सदस्य जोती मुसळे अपात्र

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 1:03AM

बुकमार्क करा

सेनापती कापशी : प्रतिनिधी

कागल पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सदस्य जोती दादू मुसळे यांचा कुणबी दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयानेही जात पडताळणी समितीच्या निर्णयाप्रमाणेच जातीचा दाखला अपात्र ठरवला आहे. त्यामुळे आमदार मुश्रीफ गटाला हा मोठा धक्‍का मानला जात आहे. या निर्णयामुळे माद्याळ मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

आलाबाद (ता. कागल) येथील जोती मुसळे इतर मागास प्रवर्गातून माद्याळ मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांचे विरोधी उमेदवार दीपक दादू शिंदे (बेलेवाडी काळम्मा) यांनी मुसळे यांच्या कुणबी जातीच्या दाखल्याबाबत हरकत घेतली होती. त्यावर कोल्हापूर येथील जात पडताळणी समितीने मुसळे यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता.

त्यामुळे मुसळे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती श्रीमती छागला यांनी मुसळे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचे स्पष्ट केलेे आहे. या निकालामुळे संजय घाटगे गटात उत्साहाचे वातावरण आहे.