Tue, Nov 20, 2018 23:12



होमपेज › Kolhapur › सरत्या वर्षात २७७ रस्ते अपघातांत२९७ बळी

सरत्या वर्षात २७७ रस्ते अपघातांत२९७ बळी

Published On: Dec 31 2017 2:20AM | Last Updated: Dec 31 2017 2:10AM

बुकमार्क करा




पणजी : प्रतिनिधी

राज्यात  2017 या मावळत्या वर्षात रस्ते अपघातांत 297 जणांना आपला जीव गमावला. यात 179  दुचाकीचालकांचा समावेश असल्याची माहिती गोवा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
राज्यात जसजशी  वाहनांची संख्या वाढत आहे तसतशी रस्ते अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.  गोव्यात सरासरी रोज एक तरी रस्ते अपघाताची नोंद होत आहे. 2016 साली राज्यात रस्ते अपघातात 336 जण ठार झाले  होते. 2016 च्या तुलनेत 2017 या  मावळत्या  वर्षात रस्ते अपघातांत बळी गेलेल्यांची संख्या कमी असली तरी प्रत्यक्षात  हा आकडा आणखी खाली आणण्याचे ध्येय सरकारने बाळगावे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  राज्यात 2017 साली  जीवघेण्या 277 रस्ते अपघातांत 297 जणांचे बळी गेले. यात  179  दुचाकी चालकांचा, 32 सहप्रवासी,19 चारचाकी चालक, 42 पादचारी, 13 प्रवासी, 9 सायकल चालक व 3 अन्य यांचा समावेश आहे. 2017 मध्ये एप्रिल  महिन्यात जुने गोवे येथे झालेल्या  भीषण  रस्ते अपघातात  पाच जण ठार झाले होते.  ठार झालेले सर्वजण मुंबई येथील होते. 2016  साली  राज्यात 278 जीवघेण्या अपघातांत 336  जणांचे बळी गेले होते. यात  164, दुचाकी चालक, 37  सहप्रवासी,21 चारचाकी चालक, 50 पादचारी, 21 प्रवासी, 1 सायकल चालक व 3 अन्य यांचा समावेश  होता, अशी माहिती  वाहतूक पोलिस सूत्रांनी  दिली.