Fri, May 24, 2019 02:44होमपेज › Kolhapur › पगारी पुजारी नेमण्यास जोतिबा भाविकांचा विरोध

पगारी पुजारी नेमण्यास जोतिबा भाविकांचा विरोध

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 19 2018 1:15AMजोतिबा : वार्ताहर  

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मंदिरात पगारी पुजारी नेमण्याच्या शासनाच्या प्रस्ताविस निर्णयास महाराष्ट्र आणि आंध्र आणि कर्नाटकातील भाविकांचा तीव्र विरोध राहील. असा निर्णय झाल्यास भाविकांच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल, असा इशारा गुरुवारी भाविकांनी दिला. जोतिबा डोंगरावरील गुरव समाज आणि भाविक यांच्यावतीने आयोजित मेळाव्यात उग्र आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. 

राज्य शासनाने पगारी पुजारी नेमण्याबाबत जोतिबा मंदिराचाही ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हा संयुक्त मेळावा घेण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित येणार्‍या सुमारे 3500 मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमण्याचा राज्य शासनाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. यात जोतिबा मंदिराचाही समावेश करण्यात येणार आहे. यामुळे जोतिबा डोंगरावरील गुरव समाज आणि भाविकांमध्ये नाराजी आहे. गुरव समाज आणि भाविक यांच्यात ऐतिहासिक काळापासून ऋणानुबंध आहेत. जोतिबाचे पुजारी आणि भाविक हे या तीर्थक्षेत्राचे प्रमुख दोन घटक आहेत.