होमपेज › Kolhapur › पंतप्रधान साधणार परीक्षार्थींशी संवाद

पंतप्रधान साधणार परीक्षार्थींशी संवाद

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 14 2018 1:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.16) परीक्षेतील ताणतणावाबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कोल्हापूर विभागातून 250 प्रश्‍न पाठविण्यात आले असून कोणत्या विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नाची निवड होते, याची उत्सुकता आहे.

शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसमवेत 16 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 12 यावेळेत संवाद साधणार आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यानी पाठविलेल्या शैक्षणिक प्रश्‍नावर चर्चा करण्यात येणार आहे. यात विभागातील लाखो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याने याची तयारी सुरू झाली आहे. दूरदर्शन संच, प्रोजेक्टर, स्क्रिनवर संवादाचे प्रसारण दाखविण्याची व्यवस्था करण्यात यावी. या कार्यक्रमाचा एक तास वगळून उर्वरित वेळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील प्रात्यक्षिक परीक्षांच्या वेळेचे पुनर्नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.