Thu, Nov 22, 2018 16:19होमपेज › Kolhapur › कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबिराचे आयोजन

कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबिराचे आयोजन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

श्रमिक प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे ‘कॉम्रेड गोविंद पानसरे’ युवा जागर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 11 ते 13 मे या कालावधीत पन्हाळगडावरील संजीवन इंजिनिअरिंग कॉलेज येथे शिबिर होईल. 

देशातील आजच्या अस्वस्थ करणार्‍या राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक भवतालात महाराष्ट्रातील विवेकवादाचा समृद्ध वैचारिक वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्याची अत्यंतिक गरज सर्वच संवेदनशील लोकांना जाणवत आहे. याच जाणिवेतून श्रमिक प्रतिष्ठानतर्फे गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले जाते. शिबिरात युवकांना व्यक्‍तीपासून ते पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीपर्यंत व्यापक भवतालाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जातो. ‘मी आणि माझा भवताल’ या बीज विषयावर हे तीन दिवसीय निवासी शिबिर असणार आहे. 

शिबिरात महाराष्ट्रातील अनेक नामवंत अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. यात आंतरराष्ट्रीय भाषा संशोधक पद्मश्री डॉ. गणेश देवी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर, अजित अभ्यंकर, संजय आवटे, इरफान इंजिनिअर, अभिजित घोरपडे, डॉ. राजन गवस, प्रा. आनंद मेणसे, दत्ता देसाई आदींचा समावेश आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी श्रमिक प्रतिष्ठान लक्ष्मीपुरी-रिलायन्समॉल समोर संपर्क साधण्याचे आवाहन नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील, डॉ. मंजूश्री पवार व डॉ. मेघा पानसरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

 Tags : Kolhapur, Kolhapur News, Organizing, Comrad Govind Pansare, Yuva, Jagar, Camp, Kolhapur


  •