Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Kolhapur › भारतीय छात्रसैनिक दर्यादिल

भारतीय छात्रसैनिक दर्यादिल

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 11:54PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमितील पन्हाळा, पावनखिंड-विशाळगड या वास्तू अनमोल ठेवा आहेत. राष्ट्रीय छात्रसेनेच्या शिबिरामुळे दर्यादील भारतीय छात्रसैनिकांशी वैचारिक देवाण-घेवाण करण्याचे भाग्य मिळाले. या अनमोल आठवणींचा ठेवा घेऊन आम्ही श्रीलंकेला जाऊ, असे उद‍्गार श्रीलंका सैन्य दलातील लेप्टन कर्नल आर. पी. जे. रथनायका यांनी काढले. 

राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने पन्हाळा ते पावनगड-विशाळगड अशा शिवाजी ट्रेल ट्रेकिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भारतीय छात्रसैनिक आणि श्रीलंकेतील छात्रसैनिक सहभागी झाली होते. कॅम्प झाल्यानंतर श्रीलंकेतील सैन्यदलातील अधिकारी व छात्रसैनिक यांचा 5 महाराष्ट्र एनसीसी बटालियनतर्फे कोल्हापूर ग्रुप मुख्यालयाचे ग्रुप कमांडिंग ब्रिगेडियर पी. एस. राणा यांच्या हस्ते श्रीलंकन अधिकारी व छात्रसैनिक यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या शिबिरामुळे श्रीलंकेतील छात्रसैनिकांना ऐतिहासिक, येथील रितीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, निसर्ग सौंदर्याचा अनुभव मिळाला, असे मत व्यक्‍त केले. यावेळी शिवाजी ट्रेल ट्रेकचे डेप्युटी मॅनेजर कर्नल आर. के. तिम्मापूर, मेजर व्ही. जे. कांबळीमठ, कर्नल एफ. एफ. अकलेसारिया व इतर अधिकारी उपस्थित होते. श्रीलंकेतील ट्रेनिग ऑफिसर कर्नल एन. एस. संघा यांनी सूत्रसंचालन केले.