Fri, Apr 26, 2019 20:16होमपेज › Kolhapur › ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन

‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 12:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ.एम.तर्फे यावर्षीही 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत सफर टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रायोजित ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बसंत-बहार रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनासाठी क्‍वेस्ट टूर्स सहप्रायोजक म्हणून लाभले आहेत.

नवे देश, नवे प्रदेश, त्यांच्या संस्कृती, मनाला मोहून टाकणारा निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात. स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात तन-मन फ्रेश करण्यासाठी प्रत्येकालाच काही काळ विश्रांतीची आवश्यकता असते. त्यात पुन्हा निसर्गाच्या सान्‍निध्यात जायची संधी मिळाली तर दुग्धशर्कराच. पर्यटकांची संख्या वर्षागणीक वाढतच आहे. अशा पर्यटकांना ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनातून देश-विदेशातील सहलींबरोबरच पर्यटनाचा खजिना खुला होणार आहे. हिरव्यागार निसर्गाच्या सान्‍निध्यात पर्यटकांना आनंद लुटता यावा, अशा विशेष सहली या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असणार आहेत. आबालवृद्धांना आनंद देणार्‍या अनेक सहलींसह ज्येष्ठांसाठीच्या तीर्थयात्रा, नवदाम्पत्यांसाठी हनिमून पॅकेज, निसर्गातील पर्यावरणपूरक सहल, कृषी पर्यटन, अभ्यास सहली यासह विविध प्रकारच्या टूर्सची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.

‘पृथ्वीवरील स्वर्ग’ अशी ओळख असणार्‍या काश्मीर, लेह-लडाख, केरळ, राजस्थान, कन्याकुमारी, अंदमान या देशांतर्गत सहलींबरोबरच युरोप, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, जपान, ऑस्ट्रेलिया अशा देशाबाहेरील सहलींचाही समावेश असणार आहे. पर्यटन क्षेत्रात सक्रिय असणार्‍या स्थानिक पर्यटन संस्थांसह जगप्रसिद्ध विविध संस्था, नामवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. देश-परदेशातील नामवंत कंपन्यांचे आकर्षक पॅकेजेस येथे उपलब्ध असतील. या प्रदर्शनासाठी स्टॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी कोल्हापूर - अमोल 9765566377, सनी 9765566413 या क्रमांकांवर संपर्क साधावा.