Sun, Jul 21, 2019 10:08होमपेज › Kolhapur › रग्गेडियन अंतर्गत हेल्थ एक्स्पोचे आयोजन

रग्गेडियन अंतर्गत हेल्थ एक्स्पोचे आयोजन

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:47AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापुरात 11 फेब्रुवारी रोजी होणार्‍या ‘हिट 24 ग्रुप प्रेझेंटस डीवायपी रग्गेडियन कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन 2018’ ची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान खेळाडूंच्या फिटनेससाठी रग्गेडियन क्लबतर्फे शुक्रवार (दि. 9) व शनिवार (दि. 10) या कालावधीत हेल्थ एक्स्पोचे आयोजन केले आहे. यामध्ये अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस्, तज्ज्ञांची व्याख्याने आणि करमणुकीची विविधता अनुभवता येणार आहे. हेल्थ एक्स्पो म्हणजे  रग्गेडियन स्पर्धेची रंगीत तालीमच असणार आहे. 

दैनिक ‘पुढारी’ मॅरेथॉनचे असोसिएट पार्टनर तर टोमॅटो एफ. एम. रेडिओ पार्टनर आहेत. हिट 24 ग्रुप प्रेझेटिंग पार्टनर तर डीवायपी गु्रप टायटल स्पॉन्सरर आहेत. विद्या प्रबोधिनीच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. कॉसमॉस बँक गोल्ड स्पॉन्सर, फॉर्च्युन शहा गु्रप व जे.के. ग्रुप व्हेंचर सिल्वर स्पॉन्सर, हॉट फ्रायडे टॉक्स लाईफस्टाईल पार्टनर,  हॉटेल थ्री लिव्ह हॉस्पिटॅलिटी पार्टनर, डॉक ऑनलाईन हेल्थ पार्टनर, कोंडूसकर ट्रॅव्हल पार्टनर आहेत. कोल्हापूर मनपाचेही सहकार्य लाभले आहे. 

मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील 12 हजारांहून अधिक धावणार आहेत. यात खेळाडू, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार-उद्योजक-व्यावसायिक, महिला व ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.  सहभागासाठी  ुुु.ज्ञेश्रहर्र्रिीीीीप.लेा/ुुुर्.ीीससशवळरप.लेा  या संकेतस्थळावरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी रग्गेडियन स्टोअर्स, डीवायपी मॉल, तिसरा मजला, डी. टी. कारेकर सराफ (घाटी दरवाजा) अंबाबाई मंदिरसमोर, रग्गेडियन ऑफिस, अमात्य टॉवर चौथा मजला, दाभोळकर कॉर्नर किंवा रग्गेडियन स्टोअर्स, डीवायपी मॉल, तिसरा मजला, कोल्हापूर आदी ठिकाणी सुरू असून याठिकाणी किंवा 9623688881, 8806226600/ 9623688886 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन
शुक्रवार 9 फेब्रुवारी : दुपारी 3 - ‘जर्नी रॉबिनहूड आर्मी’ (रॉबिन हूड आर्मी प्रतिनिधी ), 4 - इंज्युरी प्रिव्हेंशन अ‍ॅण्ड इंज्युरी व टेक्निक्स इन फिजिओ थेरपी (डॉ. प्रांजली धामणे), 4.30 - बेसीक लाईफ सपोर्ट (डॉ. भिंगार्डे), 5.30 - ‘इम्पॉर्टन्स ऑफ डाएट फॉर एनर्जेटिक परफॉर्मन्स’ (शिल्पा जाधव), सायंकाळी 6.30 - 1000 माईल जर्नी अ‍ॅक्रॉस द मंगोलियन गोबी डेसर्च (सुचेता कड्थनकर). शनिवार 10 फेब्रुवारी : दुपारी 12.30 - मिलिट्री, 2.30 - आय अ‍ॅम पॉसिबल (पंकज रवालू), दुपारी 3 - पोटेंशियल पब्लिक हेल्थ विथ होमिओपथी (डॉ. श्रृती संकपाळ-पेडणेकर), 3.30 - बॉडी मॅपिंग अँड रोड मॅप टू कॉम्रेड (डॉ. आनंद पाटील), 4.30 - एव्हरेस्ट जर्नी सर्व्हाव्हल टू समिटर (सुहेल शर्मा). 

रग्गेडियन एक्सेलन्सी पुरस्कार
हेल्थ एक्स्पोच्या निमित्ताने रग्गेडियन एक्सेलन्सी पुरस्काराचे वितरण होणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांत यशस्वी कामगिरी करणार्‍या लोकांना या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

आज हेल्थ एक्स्पो...
9 आणि 10 फेब्रुवारी रोजी सेंट झेवियर्स हायस्कूल प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत हेल्थ एक्स्पो होणार आहे. यामध्ये अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टीव्हीटी अंतर्गत झिप लायनिंग, स्विमिंग, झॉरबिंग, रॅपलिंग यासह डान्स परफॉर्मन्स, म्युझिक, फॅशन शो आदी उपक्रम होणार आहेत. याशिवाय विविध खाद्य पदार्थ व उत्पादनांचे स्टॉल  असणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आणि अधिक माहितीसाठी 9623688883 / 6 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

मॅरॅथॉनचे रनर्स कीट  10 फेब्रुवारीला सेंट झेवियर्सच्या ग्राऊंडवर होणार्‍या हेल्थ एक्स्पोमध्ये देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांनी एक्स्पोला हजेरी लावून कीट घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.