Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Kolhapur › बुद्धिबळ कार्यशाळेचे आयोजन

बुद्धिबळ कार्यशाळेचे आयोजन

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 27 2018 10:47PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

बैठ्या खेळांचा राजा आणि बौद्धिक क्षमतांचा विकास करणारा खेळ म्हणून बुद्धिबळ खेळ ओळखला जातो. या खेळाचे प्राथमिक ज्ञान देणारा अनोखा उपक्रम दैनिक ‘पुढारी’, अंकुर क्‍लबने आयोजित केला आहे. 2 ते 6 मे या कालावधीत रविवार पेठेतील जुना देवल क्‍लबजवळील, तांदळे गल्लीतील दैनिक ‘पुढारी’च्या इमारतीमध्ये कार्यशाळा होणार आहे. 

शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यात येणार्‍या बुद्धिबळ खेळाची त्यांना ओळख व्हावी, खेळाचे बेसिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. या शिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला मास्टर ऋचा पुजारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ऋचा पुजारी या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आहेत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताचे अनेकवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. 

एकग्रता, संयम, स्मरणशक्‍ती, निर्णयक्षमता, गणिती कौशल्य, धाडस, नियोजन या गुणांची क्षमता वाढविणारा खेळ म्हणून बुद्धिबळाला महत्त्व आहे. यामुळे मुलांच्या व्यक्‍तिमत्त्व विकासाबरोबर शालेय अभ्यासासाठीही उपयोग होतो. शिबिरात बुद्धिबळाच्या मूलभूत ज्ञानाबरोबरच विविध प्रकल्पांच्या माध्यमातून बुद्धिबळाविषयी आवड वाढविता येणार आहे. 

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या शिबिरात सहभागी होता येईल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आणि नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी टोमॅटो एफ. एम. कार्यालय, वसंत प्लाझा, पाचवा मजला, बागल चौक येथे 0231-6625943, प्रणव ः9422022440, अमोल-9765566377, या क्रमांकावर संपर्क साधावा.