होमपेज › Kolhapur › आयुक्‍तांना हरित लवादापुढे हजर राहण्याचे आदेश

आयुक्‍तांना हरित लवादापुढे हजर राहण्याचे आदेश

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 2:06AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिकेने ‘अमृत’ योजनेंतर्गत दिलेल्या कामाचा बारचार्ट अयोग्य व अपूर्ण असल्याचे सांगत पुढील सुनावणीला आयुक्‍तांनी हजर रहावे, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाचे न्यायाधीश रहिम जावेद यांनी दिले. रंकाळा प्रदूषणप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी याचिका दाखल केली आहे.  

‘अमृत’ योजनेंतर्गत दुधाळी नाल्यावर सहा एम. एल. डी. आणि कसबा बावडा परिसरात चार एम. एल. डी. सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्यात येणार आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी 112 कि. मी. लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. 21 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने सर्व कामे कशी आणि कधी पूर्ण करणार, याविषयीचा बारचार्ट मागितला होता. 30 नोव्हेंबरला महापालिका प्रशासनाने चार्ट सादर केला. परंतु, हा चार्ट अपूर्ण आहे, असे खंडपीठाने सांगितले. त्यामुळे 18 डिसेंबरला सुनावणी आहे.