Mon, Aug 19, 2019 07:08होमपेज › Kolhapur › पदव्युत्तर प्राथमिक शिक्षकांच्या चौकशीचे आदेश

पदव्युत्तर प्राथमिक शिक्षकांच्या चौकशीचे आदेश

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 10:39PMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील मागील दहा वर्षात बी.एड., एम.एड. झालेल्या शिक्षकांच्या चौकशीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. यातील अनेक शिक्षकांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याचे आणि त्याचवेळी शाळेत हजर असल्याचे दाखवले आहे,  अशी तक्रार झाली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी सुभाषराव चौगले यांनी पंचायत समितीकडील गटशिक्षणाधिकार्‍यांना पत्र पाठवून 2008 ते 2014 या कालावधीत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची माहिती तातडीने सादर करा, असे आदेश दिले आहेत. संबंधीत तक्रारदार हा प्राथमिक शिक्षक असून त्यांनी ‘आपले सरकार पोर्टलवर’ ही तक्रार नोंदवली होती. त्याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर चौकशीची पुढील कार्यवाही सुरु झाली आहे. 

प्राथमिक शिक्षक  म्हणून नोकरी लागल्यानंतर शासन शिक्षकाला पदवी, पदवीत्तर शिक्षक घ्या, अशी सूचना करते. त्यासाठी शिक्षकांनी शिक्षण खात्याकडे अर्ज करावा लागतो. पुढील शिक्षण घेणार्‍या शिक्षकास शासनाकडून तातडीने परवानगी मिळते. शिक्षणाची बाब असल्याने शासन संबंधीत शिक्षकाला मागेल त्यावेळी रजा मंजूर केली जाते, शिवाय वेतनही मिळत असते.तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्‍या बी.एड.,एम.एड. महाविद्यालया नियमित प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याला अभ्यासक्रम निकषानुसार वर्षातील 75 टक्के हजेरी भरणे आवश्यक असते. 2008 ते 2014 या कालावधीतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांपैकी अनेक शिक्षकांनी महाविद्यालयात हजेरी आणि शाळेच्या हजेरी बुकामध्येही सही करुन हजेरी लावली आहे. एकाच शिक्षकाने दोन्ही कामे एकाच वर्षात केली कशी, असे तक्रारदाराचे म्हणणे असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे 2008 ते 2014 व त्यापुढील कालावधीत पदवीत्तर शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची जिल्हा परिषदेने चौकशी सुरु केली आहे. 

Tags :  Kolhapur, Order,  postgraduate, primary, teachers, inquiry