Tue, Nov 20, 2018 11:09होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’ मल्टिस्टेटला संपर्क सभेतही विरोध

‘गोकुळ’ मल्टिस्टेटला संपर्क सभेतही विरोध

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 1:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यास आज झालेल्या पन्हाळा-गगनबावडा तालुक्यातील संस्था प्रतिनिधींच्या मेळाव्यात विरोध करण्यात आला. पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य दामोदर गुरव यांनी या निर्णयाला आपला विरोध असल्याचे सांगितले. 

‘गोकुळ’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्‍वभूमीवर तालुकानिहाय संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभा सुरू आहेत. आज पन्हाळा-गगनबावडा तालुक्यातील संस्थांची संपर्क सभा ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्कातील कार्यालयात झाली. अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी उद्घाटन केले. 

प्रास्ताविक भाषणात संघ मल्टिस्टेट करण्याबाबत ज्येष्ठ संचालक अरुण नरके म्हणाले, सध्या संघाकडे दररोज दहा लाख लिटर दूध संकलित होते. प्रस्तावित 20 लाख लिटर दूध संकलनासाठी संघ मल्टिस्टेट करण्याशिवाय पर्याय नाही. या निर्णयाने सभासदांच्या हक्‍कावर गदा येणार नाही. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत या ठरावाला मंजुरी द्यावी. यावर गुरव यांनी आक्षेप घेतला. त्यांनी या निर्णयाला आपला विरोध असल्याचे सांगितले. नेते व संचालकांचे हे ठरलेले आहे, अशी समजूत काढण्याचा नरके यांनी प्रयत्न केला; पण संस्था व उत्पादकांच्या हितासाठी आपला या निर्णयाला विरोध असल्याचे गुरव यांनी सांगितले. सभेला संचालक अरुण डोंगळे, रवींद्र आपटे, रणजित पाटील, बाळासाहेब खाडे, विश्‍वास जाधव, पी. डी. धुंदरे आदी उपस्थित होते.