Wed, Nov 21, 2018 23:29होमपेज › Kolhapur › शिक्षणमंत्री तावडेंची खुली चर्चा बंद खोलीत

शिक्षणमंत्री तावडेंची खुली चर्चा बंद खोलीत

Published On: Jun 09 2018 12:15PM | Last Updated: Jun 09 2018 12:15PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेलं खुल्या चर्चेचं आव्‍हान शिक्षण वाचवा समितीनं स्‍वीकारलं. आज (९ जून) हा चर्चेचा मुहूर्त ठरला. परंतु, ही खुली चर्चा बंद खोलीत कोल्‍हापुरातील रेसिडन्‍सी क्‍लब येथे होत आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह शिष्‍टमंडळाची विनोद तावडे यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा सुरू आहे. 

दरम्यान, या चर्चेपासून माध्यम प्रतिनिधींनाही दूर ठेवण्यात आले आहे. खुल्या चर्चेचं आव्‍हान असलं तरी चर्चा बंद खोलीत होत असल्याने नाराजी व्यक्‍त होत आहे. तसेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रेसिडन्‍सी क्‍लब परिसरात कडक पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्यात आला आहे.