Mon, Jun 17, 2019 02:49होमपेज › Kolhapur › राजारामपुरीत दीड किलो गांजा जप्त

राजारामपुरीत दीड किलो गांजा जप्त

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राजारामपुरी परिसरात विक्रीसाठी आणलेला दीड किलो गांजा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या परिसरातील एका घरात गांजा मिळून आला. मात्र, गांजा विक्री करणारा पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. विक्री रॅकेटमागे असणार्‍या सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस अधिक माहिती घेत आहेत. काही दिवसांपूर्वी टाकाळा येथे गांजा ओढणार्‍या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामध्ये एका महाविद्यालयीन युवतीचाही समावेश होता. यामुळे शहरातील गांजा विक्रीची केंद्रे पोलिसांच्या रडारवर असून, कारवाईची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.