Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Kolhapur › जमीन वादातून गोळीबारात एक ठार; एक गंभीर

जमीन वादातून गोळीबारात एक ठार; एक गंभीर

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 06 2018 12:39AM

बुकमार्क करा
कोल्हापूर / कोतोली : प्रतिनिधी 

शेतीच्या वादातून बोरगावपैकी चिखलकरवाडी (ता. पन्हाळा) येथे गोळीबारात सदाशिव महादेव नायकवडे (वय 50) यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी आक्‍काताई सदाशिव नायकवडे (वय 42) गंभीर जखमी झाल्या. दोघांवर भावकीतील हिंदुराव नायकवडे, शशिकांत नायकवडे या पिता-पुत्रांनी गोळीबार केल्याचे अमित सदाशिव नायकवडे याने पोलिसांना सांगितले.

शेतीच्या वाटणीवरून गेले सहा महिने वाद सुरू होता. यापूर्वी दोनवेळा हिंदुराव याने बंदूक रोखल्याची तक्रार पन्हाळा पोलिसांत केल्याचे अमित याने सांगितले. ज्येष्ठ मंडळींच्या मध्यस्थीने शनिवारी समझोता बैठक घेण्यात येणार होती.  दरम्यान, शुक्रवारी दुपारी महिलांचे किरकोळ भांडण झाले.

रात्री नऊच्या सुमारास हिंदुराव व शशिकांत यांनी सदाशिव यांच्या घरात जाऊन बंदुकीतून गोळीबार केला. त्यात सदाशिव यांच्या पोटात, तर आक्‍काताई यांच्या मांडीत गोळी लागली. मुलगा अमित हा अडविण्यास आला असता त्याच्यावरही गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सदाशिव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी आक्रोश केला.