Thu, Jun 20, 2019 01:20होमपेज › Kolhapur › तमदलगे येथे रेल्वेखाली सापडून एक ठार 

तमदलगे येथे रेल्वेखाली सापडून एक ठार 

Published On: Feb 02 2018 8:17PM | Last Updated: Feb 02 2018 8:17PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

तमदलगे येथे रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. आज सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात झाला. आनंदा दत्तू कांबळे असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘आनंदा कांबळे हे मनोरुग्ण होते. ते सकाळी दहा वाजता घरातून बाहेर पडले होते. तमदलगे ओव्हर ब्रिजजवळ रेल्वेखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला.’

अपघातानंतर जयसिंगपूर आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यांनतर शवविच्छेदन करुन साडेपाचच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणाची वर्दी आनंदा कांबळे यांचे भाऊ दीपक यांनी दिली आहे. अधिक तपास हवालदार सुनील पाटील करीत आहेत.