Sat, Jul 20, 2019 10:55होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : अप्पर लेखा परिक्षक ५ हजाराची लाच घेताना जाळ्यात

कोल्हापूर : अप्पर लेखा परिक्षक ५ हजाराची लाच घेताना जाळ्यात

Published On: Dec 10 2017 5:34PM | Last Updated: Dec 10 2017 5:34PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पतसंस्थेचा अहवाल मुख्य लेखा परिक्षकांकडे पाठवण्यासाठी लाच घेताना गडहिंग्लज येथील अप्पर लेखा परिक्षकाला अटक करण्यात आली. तानाजी दादू पाटील (वय,४०)असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

गडहिंग्लज येथे अप्पर लेखा परिक्षक सहकारी संस्थेत श्रेणी-२, वर्ग ३ तानाजी पाटील अधिकारी आहे. कोल्हापूरात स्थापन केलेल्या पतसंस्थेचा सन २०१६-१७ मधील अहवाल मुख्य लेखा परिक्षक, कोल्हापूर यांच्या कार्यालयात पाठवण्यासाठी त्याने लाच मागितली होती. याची तक्रार पतसस्थेकडून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालत करण्यात आली होती. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले असून त्याला अटक करण्यात आली.