Sun, Jul 21, 2019 00:11होमपेज › Kolhapur › मातंग समाजाच्या वतीने बुधवारी मोर्चा : ढोबळे

मातंग समाजाच्या वतीने बुधवारी मोर्चा : ढोबळे

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 12:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यात होत असलेल्या मातंग समाजावरील अन्यायाच्या विरोधात बुधवारी (दि. 4) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सोलापूरसह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील समाजातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी रविवारी पत्रकारांना दिली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चास सुरुवात करण्यात येणार आहे. 

ते  पुढे म्हणाले, पुरोगामी  म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्रात प्रतिगाम्यानेही मान खाली घालावी अशा प्रकारच्या अन्याय, अत्याचार्‍याच्या घटना घडत आहेत. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी (ता. उदगिर) येथे मारुती मंदिरात गेल्याबद्दल मातंग समाजाच्या शिंदे कुटुंबाला परागंदा केले,  जळगाव जिल्ह्यातील वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील मुलांना नग्न करून पट्ट्याने मारण्यात आले, भिमा कोरेेगाव दंगलीतील प्रत्यक्षदर्शी अकरावीत शिकणार्‍या सुरेश सकट या साक्षीदाराचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकला.

नांदेड जिल्ह्यातील अमलापूर येथे लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाची कमान लावण्याच्या कारणावरून संदीप जाधव याा खुन करण्यात आला. या घटनांमध्ये पोलिसांची भूमिका नेहमीच संशयाची राहिली आहे. त्यामुळे कायद्याचा धाक कोणाला राहिला नसल्याने आरोपी मोेकाट फिरत आहेतत. या प्रकरणांमध्ये जबाबदार असणार्‍या पोलिसांवर देखील कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी तसेच मातंग समाजावर होणार्‍या या अन्यायाच्या विरोधात व अत्याचारात बळी पडलेल्यांच्या कुटंबियांना न्याय देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चात मातंग समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.यावेळी इचलकरंजीचे नगरसेवक अब्राहम आवळे,  पंढरपूरचे माजी सभापती श्रीमंत म्हस्के, विशाल देवकुळे, अनिल म्हमाणे आदी उपस्थित होते.