होमपेज › Kolhapur › शिरढोणमध्ये अनैतिक संबंधातून वृद्धाचा खून

शिरढोणमध्ये अनैतिक संबंधातून वृद्धाचा खून

Published On: Jun 01 2018 2:04AM | Last Updated: Jun 01 2018 1:13AMकुरुंदवाड : प्रतिनिधी

शिरढोण (ता. शिरोळ) येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भूपाल गुंडू नारगुडे (वय 65) या वृद्धाचा डोक्यात रॉड घालून भीषण खून करण्यात आला. हा प्रकार गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला.याप्रकरणी रामा शंकर शहापुरे, आप्पासो शंकर शहापुरे, बाळ्या ऊर्फ सचिन आप्पासो शहापुरे, संदीप आप्पासो शहापुरे (सर्व रा. शिरढोण) या चौघांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी : भूपालचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता मोरे पाणंद रस्त्यावर भूपालला रामा, आप्पासो, बाळ्या व संदीप शहापुरे या चौघांनी बेदम मारहाण केली. काठी व लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत भूपालचा जागीच मृत्यू झाला.पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांच्या पथकाने संशयितांना सायंकाळी चार वाजता ताब्यात घेतले. हा खून झाल्याची माहिती गावात पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.