Thu, Aug 22, 2019 12:28होमपेज › Kolhapur › जातिवंत श्‍वानांची कोल्हापूरकरांना भुरळ

जातिवंत श्‍वानांची कोल्हापूरकरांना भुरळ

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:11PMकोल्हापूर : प्रतिनिधी

अमेरिकन कॉकर स्पॅनीयल, फॉक्स टेरियर, सेंट बर्नाड, बुलडॉग, जेक रसेल टेरियर, बिचॉन फ्रिसे आदी दुर्मीळ व जातिवंत श्‍वानांनी आपल्या ऐटबाज रुबाबांनी कोल्हापूरकरांना भुरळ घातली. निमित्त होते, कॅनाईन क्लब ऑफ कोल्हापूर आयोजित ऑलब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो स्पर्धेचे. लोणार वसाहत येथील गणेश लॉनमध्ये डॉग शो पाहण्यासाठी रविवारी श्‍वानप्रेमींनी गर्दी केली होती.

सकाळी 9 वाजल्यापासूनच गणेश लॉनचा संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला. आबालवृद्धांची खचाखच गर्दी झाली होती. डॉग शो पाहण्यासाठी येणारा प्रत्येकजण श्‍वानांच्या जवळ जाऊन प्रेमाने कुरवाळून त्यांचे फोटो मोबाईल, कॅमेरामध्ये टिपत होता.  काहींनी श्‍वानासोबत सेल्फीही काढला. येथे श्‍वानांसाठी लागणारे विविध साहित्यांचे स्टॉल उभारलेले होते. 

तिबेटीयन टेरीयर, अफगाण हाऊंड, चाव-चाव, वायर फॉक्स टेरियर, सेंट बर्नाड, बुलडॉग, चिहुआहुआ, स्नावझर,  पब, मुधोळ हाऊंड, डॅश हाऊंड, बुलटेरिया, सायबेरियन, पश्मी, पॉमेलियन, डॉबरमॅन, लॅब्रडोर, गोल्डन रिट्रीव्हर, रॉट व्हिलर, जर्मन शेफर्ड आदी देश-विदेशातील श्‍वान या स्पर्धेत सहभागी झाले होते. या श्‍वानांनी कोल्हापूरकरांची मने जिंकली. 

कारवान हाऊडची आकर्षक ट्रॉफी

कारवान हाऊंड या भारतीय जातीच्या श्‍वानांचे प्रमोशन करण्यासाठी कॅनाईन क्लब कोल्हापूरने यावर्षी कारवान हाऊंडच्या आकाराची प्रतिकृती असणारी ट्रॉफी तयार केली आहे. ही ट्रॉफी दिसायला खुपच आकर्षक आहे. पूर्वी संस्थान काळात कारवान हाऊंडचा वापर शिकारीसाठी केला जायाचा.

6 इंचापासून 36 इंचाचा श्‍वान...

डॉग शोमध्ये अगदी 6 इंचापासून ते 38 इंचाचा श्‍वान सहभागी झाला होता. चिहुआहुआ हा सर्वात लहान म्हणजे सहा इंचाचा तर, ग्रेड डेन हा सर्वात मोठा 36 इंचाचा श्‍वानही स्पर्धेत पहायला मिळाला.