Sat, Nov 17, 2018 06:23होमपेज › Kolhapur › प्रसंगी कायदा हातात घेऊ

प्रसंगी कायदा हातात घेऊ

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 06 2018 11:16PMरूकडी : वार्ताहर

पंचगंगा प्रदूषण मुक्‍तीसाठी शासनाने तत्काळ लक्ष घालून नदीकाठच्या नागरिकांचे हाल थांबवावेत अन्यथा कायदा हातात घेऊ, असा इशारा माजी आमदार राजीव आवळे यांनी दिला. हातकणंगले तालुक्यातील मुडशिंगी येथे सहाव्या दिवशी साखळी उपोषण प्रसंगी ते बोलत होते. पंचगंगा बचाव कृती समितीचे समन्वय धैर्यशिल माने यांच्या नेतृत्वाखाली गेली 6 दिवस आम्ही साखळी उपोषण करत आहोत. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या सरकारला अद्याप जाग आलेली नाही. सरकारने याची तत्काळ दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी यावेळी आवळे यांनी केली. मनसेचे जिल्हा प्रमुख गजानन जाधव यांनीही पंचगंगा प्रदूषण मुक्‍तीसाठी ठोस उपाययोजना तातडीने करण्यात यावी, अशी मागणी केली. 

यावेळी रूकडीचे उपसरपंच शीतल खोत, अमोल कुलकर्णी, राजू अपराध, बाबासो मंडले यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी अनिल बागडी-पाटील, सुहेल मकानदार, शंकर जाधव, शहाजान शेख, शामराव अनुसे, अमोल कोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.