होमपेज › Kolhapur › सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा

Published On: Jan 11 2018 1:06AM | Last Updated: Jan 11 2018 12:37AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 
सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. कोल्हापूर बंददरम्यान  बदनामीकारक मजकूर टाकू नये, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले होते. मात्र, यानंतरही  एकाने असे कृत्य केल्याने  गुन्हा दाखल केला.

भीमा-कोरेगावातील घटनेनंतर बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरात हिंसक वळण लागले. व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकवरुन कोणीही आक्षेपार्ह किंवा दंगलविषयक मजकूर टाकू नये असे आवाहन पोलिसांनी केले होते.  दोन दिवस इंटरनेट सेवाही बंद केली होती. 

दरम्यान, मंगळवारी करवीर तालुक्यातील इका तरुणाने व्हॉटसअ‍ॅप गु्रपवर राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचा मॅसेज पाठविला होता. ही बाब सायबर सेलच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी संबंधित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.  बुधवारी न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला.