Thu, Mar 21, 2019 11:08होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : नृसिंहवाडीत सुमोच्या धडकेत तरुण ठार

कोल्‍हापूर : नृसिंहवाडीत सुमोच्या धडकेत तरुण ठार

Published On: Apr 08 2018 3:56PM | Last Updated: Apr 08 2018 3:47PMजयसिंगपूर: प्रतिनिधी

नृसिंहवाडी -औैरवाड नव्या पुलावर टाटा सुमोने पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलस्वार ठार झाला. सुमोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा पाय मांडीपासून तुटून पुलावर पडला तर ठार झालेल्या तरुणाचा मृतदेह कृष्णा नदीत पडला. या अपघातात राहुल चव्हाण (वय ३५) हा तरुण ठार झाला आहे. 

टाटा सुमो औरवाड येथील असल्याचे समजते. अपघातात ठार झालेला तरुण हा घालवाड (ता. शिरोळ) येथील आहे. त्याचे पूर्ण नाव समजले नाही.
चव्हाण हे शेडशाळ येथून परतत असताना हा अपघात झाला. अद्दाप मृतदेह सापडला नाही. नदीत केंदाळ असल्याने अडचण येत आहे. अपघातात धडक इतकी भयानक होती की, दुचाकीस्‍वाराचा पाय मांडीपासून तुटून खाली पडला होता. अपघातानंतर पुलावर मोठी गर्दी झाली होती.