Thu, Mar 21, 2019 11:41होमपेज › Kolhapur › नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली

नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:34AMनृसिंहवाडी : प्रतिनिधी

पावसाची संततधार सुरू आहे. शिवाय काही धरणांतील पाण्याचा विसर्ग यामुळे पूरस्थिती कायम आहे. काही गावांतील नदीकाठच्या घरांत पाणी शिरले आहे. नृसिंहवाडीचे दत्त मंदिर गुरुवारी पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी येथे तीन फुटांनी वाढली आहे. कृष्णा, पंचगंगा नदीकाठची कुरणे पाण्याखाली गेली आहेत. दत्ततीर्थ व परिसरात गुरुवारी पाणी शिरले आहे. दरम्यान, दत्त मंदिरातील ‘श्रीं’च्या पादुकांवर पाणी आहे. त्यामुळे नारायण स्वामी मंदिरात उत्सव मूर्तीची महापूजा व नित्य कार्यक्रम सुरू आहेत. दर्शनासाठी तेथे रांग लागली होती.