होमपेज › Kolhapur › जोतिबा देवस्थान ‘ऑनलाईन’

जोतिबा देवस्थान ‘ऑनलाईन’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जोतिबा : वार्ताहर

दख्खनचा राजा श्री जोतिबाचे प. म. देवस्थान समितीच्या माध्यमातून आता संपूर्ण जगातील भाविकांना घरबसल्या दर्शन होणार आहे. जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांच्या हस्ते देवस्थान समितीने सुरू केलेल्या www.shrijotiba.com  या संकेतस्थळाचे जोतिबा मंदिरामध्ये शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. 

 श्री क्षेत्र जोतिबाचे भक्‍त देशाबरोबरच देशाबाहेरही मोठ्या प्रमाणात आहेत. या भाविकांना जोतिबाचे ऑनलाईन दर्शन घेता यावे, तसेच मंदिरात होणार्‍या दररोजच्या पूजा आणि त्यांची माहिती मिळावी, या उद्देशाने प.म.देवस्थान समितीने दख्खनच्या राजाची वेबसाईट काढण्याचा निर्णय घेतला होता. योगेश साळवी आणि प्रवीण भोसले यांनी जोतिबाची माहिती, जोतिबा डोंगर आणि परिसराची माहिती आणि पूजा विधींची परिपूर्ण अशी माहिती असणारी वेबसाईट बनवली आहे. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, सदस्या संगीता खाडे, सचिव विजय पोवार, शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी आर.आर.पाटील, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Jyotiba Devasthan, Online


  •