Fri, Jul 19, 2019 18:38होमपेज › Kolhapur › आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही!

आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही!

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 03 2018 10:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गेले आठ दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. समाजातील सर्वच जाती-धर्मीयांनी यास पाठिंबा देऊन ऐतिहासिक दसरा चौकात ठिय्या मांडला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील गावा-गावांत बंद पुकारून ग्रामस्थांनी  आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर पायी चालत येऊन सकल मराठा समाज बांधव दसरा चौकातील ठिय्या आंदोलनातदेखील सहभाग नोंदवताना दिसत आहेत.

पाचगाव, दर्‍याचे वडगाव, गडमुडशिंगी, मोरेवाडी, राशिवडे बुद्रुक यांच्यासह जिल्ह्यातील  विविध संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांनी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात गुरुवारी सहभागी होऊन पाठिंबा दिला.पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांच्यासह उपसरंपच संग्राम पोहाळकर, राधिका खडके, चिले, भाग्यश्री दळवी, मेघा गाडगीळ, प्रकाश गाडगीळ, संजय पाटील, विष्णू डवरी, स्नेहल शिंदे, लालासो गायकवाड, पांडुरंग पाटील, संजय शिंदे उपस्थित होते. मोरेवाडीच्या सरपंच सौ. सुनंदा कुंभार यांच्यासह उपसरपंच सौ. वैशाली भोसले यांच्यासह आशिष पाटील, अमर मोरे, सुनीता जाधव, शिवानी देसाई, नियाज नदाफ, संभाजी मोरे, महेश मोरे, सुदर्शन पाटील, मनोज सरनोबत, स्वप्नील गोते उपस्थित होते. दर्‍याचे वडगावचे सरपंच अनिल मुळीक यांच्यासह उपरपंच धनाजी बेनके, राजेंद्र मुळीक, मिलिंद पाटील, सागर हिंदूळे, शहाजी मगदूम, दगडू बेनके, महिपती बोडके, शशिकांत मुळीक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील सकल मराठा समाजबांधव गाव बंद पुकारून भगवे ध्वज घेऊन येथे रॅलीने ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. यामध्ये सरंपच तानाजी पाटील, अशोक दांगट, पोपट दांगट, सचिन पाटील, रावसाहेब पाटील, अप्पासाहेब धनवडे, शिवाजी गिरुले, संजय दांगट, बाबासो पाटील, विनोद सोनुले, अरुण गिरगावे, अमित माळी, रणधीर पाटील, राहुल गिरुले, अमित पाटील, भिकाजी घाटगे, मधुकर पताडे, रणधीर पाटील यांच्यासह मुडशिंगी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळे, महिला बचत गटांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता दल (सेक्युलर) कोल्हापूरच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलकांना पाठिंबा देऊन ठिय्या मांडला. यामध्ये शिवाजीराव परुळेकर, विठ्ठलराव खोराटे, वसंतराव पाटील, विठ्ठल मुसळे, संभाजी पाटील, एम.डी.पाटील, बबन पाटील, शरद पाडळकर, दिनकर पाटील, श्रीकांत साळोखे, वाय.डी.पाटील, दिनकर पाटील, जयसिंग वागरे, पांडुरंग एकशिंगे, हिंदुराव पाटील, आनंदा पाटील, सुरेश पाटील, बळवंत मुसळे, सीताराम खाडे आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना कोल्हापूर यांनी पाठिंबा दिला.शौकत महालकरी, रवींद्र मोरे, गजानन हवलदार, राजराम पवार, परशुराम चौगुले, राजेश मंडलिक, अशोक सोलापुरे उपस्थित होते. ग्रामपंचायत राशिवडे बुद्रुक ग्रामस्थांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला. दसरा चौकात येऊन ग्रामस्थांनी पाठिंबा देत ठिय्या मांडला .सरपंच कृष्णात पोवार, उपसरपंच सम्राट पाटील, रंगराव चौगले, संगिता मगदूम, साऊताई शिंदे, भीमराव गोसावी, अनिता लाड, सागर धुंदरे, जयसिंग पाटील, धनश्री बिल्ले, अनिल वाडकर, सीमा देसाई, राजाराम कांबळे, अंबुबाई चांदणे, स्वाती पाटील, अतुल पाटील, भारती टिपुगडे, स्वप्नाली गोनुगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बहुजन क्रांती मोर्चाने पाठिंबा देऊन ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. गौरव पणोरेकर, मनोहर चौगले, प्रसाद जाधव, योगेश कांबळे, नामदेव गुरव, गौतम बनसोडे, हिंदू एकता आंदोलन मिरजकर तिकटी यांनी आंदोलकांना पाठिंबा दिला. यावेळी लालासो गायकवाड, हिंदुराव शेळके, शांताराम इंगवले, जयदीप शेळके, उदय लाड, अण्णा पोतदार आदी उपस्थित हेाते. कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्थेने पाठिंबा दिला.यावेळी दयानंद जंगम, दीपक जंगम, प्रसाद जंगम, वैभव जंगम, सोमनाथ जंगम, संतोष जंगम, रमेश स्वामी, राहुल जंगम, रामंचद्र स्वाती, सचिन जंगम, दयानंद स्वामी, सातलिंग जंगम, संदीप जगंम, दुंडय्या हिरेमठ, रामचंद्र जंगम आदी उपस्थित होते. वीरशैव कक्कया (डोहर) समाज व चर्मकार समाज कृती समिती कोल्हापूर जिल्हा यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी शिवाजी पोळ, भूपाल शेटे, निरंजन कदम, दुर्वास कदम, राहुल सोनवणे, हरिदास सोनवणे, बृहस्पती भोसले, राजू मालेकर, किशोर कदम, सुखदेव सातपुते, रमेश सोनवणे, अनिल पोळ, गणेश नारायणकर, गणपत कदम, तुळीदास व्हटकर, सुदीश व्हटकर, शाँडो रोटे, परशराम सातपुते, अरूण सातपुते, पंकज मगर, रवी पवार, रवी सातपुते, शिरीष कारंडे, पंडत बामणे, पप्पू बामणे, रवी बामणेकर, संजय पोवार, शशिकांत पोवार, विलास गाडेकर, विशाल पवार, भीमराव पाटील, नीलेश पोळ आदी उपस्थित होते. 

आंंदोलनस्थळी मदत पेटी ठेवावी...
मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी बलिदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी संयोजकांनी आंदोलनस्थळी मदत पेटी ठेवावी. तसेच मदतीचे आवाहनही करावे. मदत पेटीत यथाशक्ती आर्थिक मदत जमा करावी. जमा झालेली रक्कम ही आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना देऊ या, असे आवाहन माजी आमदार सुरेख साळोखे यांनी केले.

पोलिसांचे युवकांना सुरक्षिततेचे आवाहन 
दसरा चौकातील ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून जनसागर उसळला आहे. यामध्ये युवकांचा लक्षणिय सहभाग आहे.अनेक तरूण दुचाकीवरून धोकादायरित्या प्रवास करून येत आहेत. दुचाकीवर तीघे, चौघे तसेच सीटवर उभे राहून आपला जीव धोक्यात घालत आहेत. अशा युवकांना पोलिसांकडून सुरक्षिततेचे आवाहन केले जात आहे.