Thu, Jun 04, 2020 05:54होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा बुडून मृत्यू

कोल्हापूर : वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा बुडून मृत्यू

Last Updated: Apr 10 2020 4:58PM

मृत अमृता काकासो पांढरेजरळी (गडहिंग्लज): पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच रहा... सुरक्षित रहा... असा टाहो फोडत शासन लोकांना घरीच बसण्याचा आवाहन करत आहे. असे असतानाही शेतातील कामाचे निमित्त एका नऊ वर्षाच्या मुलीच्या जीवावर बेतले. पोहायला शिकताना वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा बुडून मृत्यू झाला. गडहिंग्लज तालुक्यातील जरळी येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जरळी येथील अमृता काकासो पांढरे असे दुर्दैवी मृत बालिकेचे नाव आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. 

कर्जमर्यादेवर 10 टक्के रक्कम द्या बँक योजनेची अंमलबजावणी करा

याबाबत माहिती अशी, आज सकाळी काकासो पांढरे हे आपली मुलगी अमृता व मुलगा आर्यन यांच्यासह सरपणासाठी झाड तोडायला गेले होते. त्यानंतर तिघेही जवळच्या कुंभार (मुगळी) यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले. अमृताला पोहता येत नसल्याने डबा बांधलेला होता. पोहून परत येताना अमृताने बांधलेला डबा सोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तोल गेल्याने ती थेट विहिरीत पडली. यावेळी तिचे वडील थोड्या अंतरावर पुढे गेले होते. यावेळी अमृता दिसत नसल्याने भाऊ आर्यनने वडिलांना हाक दिली. त्यांनी तातडीने विहिरीत उडी मारून अमृता हिला शोधण्याचा प्रयत्न केला; पण ती हाती लागली नाही. आरडाओरड केल्यावर शेजारचे लोक गोळा झाले. त्यांनी विहिरीत शोधाशोध केली असता मृतदेह मिळून आला. याबाबतची नोंद गडहिंग्लज पोलिसांत झाली आहे.