Sun, Mar 24, 2019 06:13होमपेज › Kolhapur › शेतकरी संघटनेचे नऊ कार्यकर्ते ताब्यात

शेतकरी संघटनेचे नऊ कार्यकर्ते ताब्यात

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकल्याप्रकरणी रघुनाथदादाप्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोन दिवसांपूर्वी साखरेच्या एफआरपीबाबत लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले होते. 

याप्रकरणी अ‍ॅड. माणिक बाबुराव शिंदे (वय 42, रा. भुये, ता. करवीर), पांडुरंग गणपती पाटील (68, रा. वाकरे, ता. करवीर), महादेव शंकर कोरे (64, मिरज), अजित बाबुराव पाटील (61, वडणगे, ता. करवीर), गुलाजी हणमंत शेलार (57, कुडित्रे), बाळासाहेब दत्तात्रय मिरजे (56, रा वडणगे, ता.करवीर), शंकर भिमराव मोहिते (60, रा. इस्लामपूर),  हणमंतराव यशवंत पाटील (55, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), इकबाल दादू जमादार (वय 65, रा. बोरगाव, ता. वाळवा) या सर्वांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

याबाबत रविकांत उपाध्ये यांनी फिर्याद दिली होती. आंदोलनानंतर संबधितांनी शेतकरी संघटना जिंदाबाद अशा घोषणा देत कार्यालयात प्रवेश केला. शासकीय काम बंद पाडून कर्मचार्‍यांना बाहेर काढले. तसेच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले होते.

साखर संचालक व कारखानदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा
साखर हंगामामध्ये एफआरपी आणि त्यावरील  प्रती टन जादा 200 रुपये देणेचे ठरले होते. यानंतर हंगाम सुरू होऊन तीन महिने उलटले तरीही कारखानदारांकडून एफआरपीप्रमाणे पैसे न देता ठरलेल्या दरामध्ये 500 रुपये कमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत साखर संचालकांनी कार्यवाही न केल्याने विभागीय साखर संचालक सचिन रावळ, आर. एस. उपाध्ये व कारखानदार यांच्यावर कलम 420 म्हणजे फसवणुकीच्या कलमाखाली कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने लक्ष्मीपुरी पोलिसांना देण्यात आले. यावर अ‍ॅड. माणिक शिंदे, पांडुरंग पाटील यांच्या सह्या आहेत.