Mon, Apr 22, 2019 22:08होमपेज › Kolhapur › वृत्तपत्र समाजमन दाखवणारा आरसा 

वृत्तपत्र समाजमन दाखवणारा आरसा 

Published On: Jan 11 2018 1:06AM | Last Updated: Jan 11 2018 12:23AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

वृत्तपत्र म्हणजे समाजमन दाखवणारा आरसा असतो. समाजाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी ते वृत्तपत्रांतून मांडण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन सिक्‍कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.  कोल्हापूर प्रेस क्‍लबच्या वतीने आयोजित केलेल्या उत्कृष्ट पत्रकार, छायाचित्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.  केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शाहू महाराज होते. 

प्रारंभी उत्कृष्ट पत्रकार म्हणून समीर देशपांडे, उत्कृष्ट छायाचित्रकार राहुल गायकवाड, झी वाहिनीचे पत्रकार प्रताप नाईक, कॅमेरामन प्रमोद सौंदंडे, अ‍ॅड फाईनचे संचालक अमर पाटील आदींना राज्यपाल पाटील व शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

‘आजची पत्रकारिता’ या विषयावर बोलताना राज्यपाल पाटील म्हणाले,  स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या दै. ‘दर्पण’पासून आजपर्यंत अनेक वृत्तपत्रे होऊन गेली. अनेक वृत्तपत्रांनी चढ-उतार पाहिले; पण जी दैनिके समाजाचे प्रतिबिंब म्हणून राहिली, तीच वाढली आणि मोठी झाली. बातमी मांडताना  पत्रकारांनी समाजातील छोटे छोटे प्रश्‍न घेऊन ते तडीस न्यावेत.
यावेळी शाहू महाराज, खा. धनंजय महाडिक, महापौर सौ. स्वाती यवलुजे यांची भाषणे झाली. स्वागत प्रेस क्‍लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी केले. आभार उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी मानले.