Mon, Nov 19, 2018 04:38होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’कडून ऊर्जाबचतीचे राष्ट्रीय कार्य

‘गोकुळ’कडून ऊर्जाबचतीचे राष्ट्रीय कार्य

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 28 2018 1:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)  हा सहकारातील अग्रगण्य संघ असून दुग्धव्यवसायाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आदी क्षेत्रात नेत्रदीपक काम करून राज्यात नावलौकिक मिळवला आहे. उत्पादकांची उन्‍नती साधताना ग्रामीण भागाचा विकास केला आहे. गोकुळ दूध संघाने ऊर्जाबचतीसाठी सलग पाचव्यांदा राज्य शासनाचा ऊर्जाबचतीसाठी राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून पुनः एकदा या क्षेत्रात आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेले आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे येथे राज्य शासनातर्फे देण्यात येणार्‍या ऊर्जाबचत पुरस्कार वितरण प्रसंगी केले. 

अपारंपरिक ऊर्जा (मेडा) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री  बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व मंत्री गिरीश बापट- अन्‍न व औषध प्रशासन मंत्री, मंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री सामाजिक न्याय व पुनर्वसन व नाम.विजय शिवतारे- राज्यमंत्री जलसंपदा व जलसंवर्धन, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत गोकुळला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंग, महासंचालक बिपीन शर्मा, ब्युरो ऑफ एनर्जी इफिसीएन्सी, नवी दिल्लीचे महासंचालक अभय भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.  गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील, संचालक विश्‍वास जाधव, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, विद्युत अभियंता एस.आर.शिंदे आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.