Tue, Jul 23, 2019 02:23होमपेज › Kolhapur › राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अभिज्ञा पाटीलला ४ सुवर्ण

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अभिज्ञा पाटीलला ४ सुवर्ण

Published On: Jun 25 2018 6:35PM | Last Updated: Jun 25 2018 6:35PMकोल्‍हापूर : क्रीडा प्रतिनिधी

नवी दिल्ली येथे झालेल्या कुमार सुरेंद्र सिंग शूटिंग चॅम्पियनशीप आणि ट्रायल क्रमांक पाचमध्ये अभिज्ञा पाटीलने सलग ४ सुवर्णपदके पटकावली आहेत.

१० मीटर एयर पिस्टल प्रकारात सीनियर गटात ६०० पैकी ७५३ गुणांची कमाई करत हीना सिद्धू, हरिवीन सराव यासारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडूंना कडवी झुंज देत तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

तसेच १० मीटर एयर पिस्टल प्रकारात ज्युनिअर गटात योगिता व नयनी भारद्वाज यांच्यावर मात करुन ५७३ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. १०मीटर एयर पिस्टल प्रकारात ट्रायल पाचमध्ये ज्युनिअर गटात सुवर्णपदक,  २५ मीटर .२२  स्पोर्ट्स पिस्टल प्रकारात ज्युनिअर गटात ५७१ गुणांसोबत सुवर्णपदक पटकावले.

कुमारी अभिज्ञा पाटील ही कोल्हापूर जिल्हा क्रीडा प्रबोधनीची विद्यार्थिनी आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य माणिकराव वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, तोसिफ सय्यद, संदीप तरटे, अजित पाटील, युवराज साळुंखे, जितेंद्र विभुते यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले या बरोबर आई-वडील प्रतिभा पाटील व  अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.