Mon, Mar 25, 2019 13:12होमपेज › Kolhapur › 'आई अंबाबाई महाराष्ट्राला वाचव'; पवारांचे देवीला साकडे

'आई अंबाबाई महाराष्ट्राला वाचव'; पवारांचे देवीला साकडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

'पीएनबी घोटाळा, उद्याोजक आणि मंत्र्यांचे कर्ज प्रकरणे, भ्रष्टाचार या सगळ्यातून महाराष्ट्राला वाचव', असे साकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अंबाबाईच्या चरणी घातले. मंत्र्यांचे कर्ज सेटल होतं, निरव मोदी पैसे घेऊन पळून जातो, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही. इतर राज्यांत पेट्रोल स्वस्त आहे, महाराष्ट्रातच महाग का? असे सर्व प्रश्न घेऊन आम्ही हल्लाबोल करत आहोत, असेही ते म्हणाले. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरूवात पश्चिम महाराष्ट्रातून झाली. यावेळी अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले आणि राज्याला वाचव असे साकडे घातले. 

सभागृह म्हणजे काय प्राणी संग्रहालय वाटलं का?

मंत्रालयात उघडकीस आलेला उंदीर घोटाळा यावरूनही त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारतर्फे केवळ उंदीर, वाघ, सिंह याची चर्चा झाली. सरकारला सभागृह म्हणजे काय प्राणी संग्रहालय वाटलं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन होतं पण सर्व राहिले बाजूला सरकारने या अधिवेशनाच्या माध्यमातून काहीही केले नसल्याची टीकाह अजित पवार यांनी केली. 

पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय 

या सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. आम्ही सरकारमध्ये असताना या भागात विशेष लक्ष होते. आज राज्यात प्रत्येक घटकाचे मोर्चे निघत आहेत. सरकार शाळा बंद करत आहे. पेपर फुटतात, कायदा सुव्यवस्था नीट नाही. सरकार यावर उत्तर देत नाही, वेळ मारून नेत आहे असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला.  राज्यातील अस्वस्थता संपू दे, शाहू-फुले-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराने पुढे जाऊ दे, म्हणून माता अंबाबाईला साकडं घातल असल्याचेही ते म्हणाले. 

Tags : Kolhapur, Natioanl Congress Party, Politics, Ambabai tempal, Ajit pawar, Dhananjay Munde, Supriya Sule 


  •