Mon, Mar 18, 2019 19:34होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : फुटीर नगरसेवकाच्या घरावर मोर्चा (Video)

कोल्हापूर : फुटीर नगरसेवकाच्या घरावर मोर्चा (Video)

Published On: Feb 14 2018 1:03PM | Last Updated: Feb 14 2018 1:04PM
कोल्हापूर : प्रतिनिधी
स्थायी समिती सभापती निवडणुकीत नाट्यमयरित्या भाजप-ताराराणी आघाडीच्या गोटात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अफजल पिरजादे यांच्या घरावर आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पालिकेतील राष्ट्रवादीचे सदस्य आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढून, पिरजादे यांच्या घराबाहेर निदर्शने केली. 

महापालिकाचा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. सीपीआर चौक मार्गे मोर्चा पिरजादे यांच्या बुधवार पेठेतील घरावर गेला. तेथे जोरदार निदर्शने करण्यात आली. नगरसेवक पिरजादे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. चोर हे चोरे, अफजर पिरजादे चोर है तसेच गद्दार है गद्दार है, अफजर पिरजादे गद्दार है, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. 

स्थायी समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील यांचा दोन मतांनी पराभव झाला आणि अनपेक्षितपणे भाजपचे आशिष ढवळे सभापतीपदी निवडून आले. राष्ट्रवादीकडून अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण हे सदस्य फुटले त्यामुळे त्याचे पडसाद आज, शहरात उमटले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने पिरजादे यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.