Thu, Jun 27, 2019 16:12होमपेज › Kolhapur › लिंगायत समाज आरक्षणाला सरकारचा ‘खो’ : मुश्रीफ

लिंगायत समाज आरक्षणाला सरकारचा ‘खो’ : मुश्रीफ

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 19 2018 1:30AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

लिंगायत समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सकारात्मक होते. पण सध्याच्या सरकारच्या धोरणामुळे लिंगायत आरक्षणाच्या आरक्षणाला खो बसला आहे, असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. दसरा चौकातील लिंगायत समाजाच्या वतीने सुरू असणार्‍या ठिय्या आंदोलनात ते बोलत होते. 

आ. मुश्रीफ म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीने 2014 मध्ये राज्य मंत्रिमंडळात लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा ठराव केला.त्याबाबतची शिफारसही केंद्राकडे पाठविण्यात येणार होती. मात्र, सरकार बदलले. गेली चार वर्षे सत्तेत असणार्‍या या सरकारने यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. लिंगायत समाजाच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस  ताकदीने उभा आहे.

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप म्हणाले, आरक्षण हा लिंगायत समाजाचा अधिकार आहे. मात्र, तो हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.आमच्या सरकारने अनेक पोटजातींना न्याय दिला. आरक्षणाच्या लढाईत आमचा सक्रिय सहभाग असेल.

शनिवारी आंदोलनाची सुरुवात शिवयोग साधना करून झाली. अमोल चौगले, सच्चिदानंद आवटी, रावसाहेब वाणी, अविनाश शेटे, आण्णाप्पा पंदारे यांच्यासह कागल, आणूर, माणगाव, कडलगे, हालसवडे, सावर्डे, पुलाची शिरोली, माळ्याची शिरोली, हळदी आदी गावांतील समाज बांधवांनी या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.