Sun, Sep 23, 2018 06:06होमपेज › Kolhapur › ‘धनगर समाजाची काँग्रेस-राष्ट्रवादीकडून दिशाभूल’

‘धनगर समाजाची काँग्रेस-राष्ट्रवादीकडून दिशाभूल’

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

धनगर समाजाच्या द‍ृष्टीने भंडारा अत्यंत भावनिक व पूजनिय असून या भावनिकतेचा खेळ करून केवळ भावनिक आवाहन करत धनगर समाजाची दिशाभूल करण्याचे काम आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारने केले, मात्र राज्यातील आमच्या युतीच्या सरकारने केवळ आश्‍वासने न देता, थेट कृती करण्यावर भर दिला असून धनगर समाजातील वाड्या वस्त्यांवर पायाभूत व मूलभूत सुविधा देण्यावर भर दिला आहे.  त्यामुळे  विरोधकांनी राजकारण म्हणून टीका टिप्पणी न करता वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असा टोला पालकमंत्री पाटील यांनी लगावला.  

धनगर समाज मोर्चावेळी आमदार सतेज पाटील यांनी टीका करताना भंडारा हातात घ्या आणि आरक्षण कधी देणार याची तारीख जाहीर करून टाका आणि सरकारने ठरवले तर 24 तास सुद्धा लागणार नाहीत; पण ती इच्छाशक्‍ती सध्याच्या सरकारकडे नाही, अशी टिप्पणी केली. याचवेळी या व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी स्वतः सामोरे गेले. त्यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबात प्राप्त अहवालाआधारे भक्‍कम पुराव्यानिशी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि अन्य मागण्यांबाबत सकारात्मक असून हे सरकार म्हणजे झोपेत दिलेला शब्द पाळणारे आहे, असे सांगितले.