Mon, May 20, 2019 08:02होमपेज › Kolhapur › राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा ए. वाय. पाटील 

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा ए. वाय. पाटील 

Published On: Apr 23 2018 1:51AM | Last Updated: Apr 22 2018 11:30PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष आनंदराव यशवंतराव तथा ए. वाय. पाटील यांची फेरवर्णी लागली आहे. त्यांच्या निवडीची शिफारस आ. हसन मुश्रीफ यांनी केली. माजी खा. श्रीमती निवेदिता माने यांनी अनुमोदन दिले. पदाधिकार्‍यांनी हात उंचावून या शिफारशीला पाठिंबा दिला आहे. यामुळे ए. वाय. यांची फेरनिवड निश्‍चित असून, केवळ प्रांतिककडून अधिकृत घोषणा करण्याची औपचारिकता शिल्‍लक आहे. 

जिल्हा कार्यकारी निवडीचे प्रदेश निरीक्षक दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत ताराबाई पार्क येथील जिल्हा कार्यालयात या निवडीचा कार्यक्रम झाला. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी अनिल साळोखे यांनी या निवडीबाबत आ. मुश्रीफ यांना सर्वाधिकार देण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आ. हसन मुश्रीफ यांनी ए.वाय. यांच्या नावाची शिफारस केली.  दिलीप पाटील यांनी उपस्थित प्रतिनिधींना आवाहन करून या शिफारशीला पाठिंबा देण्याची विनंती केली. सर्व प्रतिनिधींनी हात उंचावून ए.वाय. यांना पाठिंबा दिला. तर दिलीप पाटील यांनी ही शिफारस प्रदेशकडे पाठविण्यात येणार असून, प्रांतिकची बैठक 29 एप्रिल रोजी होणार असून, या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा होईल, असे जाहीर केले.

Tags : Kolhapur, NCP, District, President,  A Y Patil