Fri, Apr 26, 2019 09:44होमपेज › Kolhapur › ‘संगीत सम्राट’ने रसिक मंत्रमुग्ध

‘संगीत सम्राट’ने रसिक मंत्रमुग्ध

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 11:23PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्श शिंदे, शास्त्रीय संगितातील व्यक्तिमत्त्व राहुल देशपांडे यांच्यासह विविध कलाकारांच्या कलाविष्काराने संगीत सम्राटची मैफल चांगलीच रंगली.  यावेळी शास्त्रीय संगीतासह विविध गीते आणि लावण्यांना टाळ्या अनं शिट्ट्या वाजवून प्रेक्षकांनी नाट्यगृह अक्षरश: डोक्यावर घेतले. झी युवा आणि दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीत सम्राट मॅरेथॉन ही संगीत मैफल येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाली. 

गायिका सावनी रवींद्र यांच्या  ‘आदी माया आंबाबाई, सार्‍या दुनियेची आई’ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘नाही कळले कधी जीव’,  यासह ‘बुगडी माझी सांडली ग...’, ‘हात नका लावू माझ्या साडीला’ आदींसह मिक्स लावण्यांनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. जुईली जोगळेकर यांच्या ‘कांदा पोहे’, ‘एक तारा कबीरा’ ‘गोर्‍या गोर्‍या गालावरी चढली लाली’ आदी गीतांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. कोल्हापुरी गायक, गीतकार अभिजित कोसंबीनी  आई भवानीचा  ‘गोंधळ’ घालून सभागृहात उत्साह भरला. सैराट चित्रपटातील ‘याड लागलं ग याड लागलं’ या गीतास प्रेक्षकांनी शिटट्या आणि टाळ्यांव्दारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आदर्श शिंदे यांनी संगीत सम्राट  कार्यक्रमातून चांगले टँलेट पुढे येईल, असा विश्‍वास व्यक्त केला. तर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला’ गाणे सादर केले. या गीतास रसिकांचा वन्समोर मिळाला. तर गायक राहुल देशपांडे यांनी कट्यार काळजात घुसली नाटकातील ‘दिल की तापीश आज है’ हे गीत सादर करून सर्वांना सुखद आनंद दिला. स्वरांजली बँडचे कलाकार  मिलिंद बनसोडे, उद्धव जाधव, विनय नरगुंडे, विनोद सावंत, समर्थ कांबळे, प्रकाश हेगिष्टे यांनी सगीत साथ दिली. सौरभ सोहनी यांनी निवेदन केले. माऊली माऊली रूप तुझे या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.