Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Kolhapur › थकबाकीपोटी महापालिका घरफाळा विभागाची कारवाई 

महापालिका नगररचना कार्यालय सील

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:54AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिकेच्या ई वॉर्ड घरफाळा विभाग, राजारामपुरी बागल मार्केट या कार्यक्षेत्रामधील मिळकतधारकांच्या आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी 2 डिसेंबर 2017 रोजी रक्कम रुपये 10 लाखांच्या पुढील घरफाळा थकबाकीपोटी एकूण 14 मिळकतींच्या सुनावणी घेण्यात आल्या असून, त्या सर्व मिळकतधारकांवर मा. कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करण्यात आले आहेत.  त्या अनुषंगाने उपसंचालक नगररचना कार्यालय, प्रादेशिक योजना यांच्या एकूण थकबाकी रु. 21 लाख 66 हजार थकबाकीपोटी सीलबंदची कारवाई करण्यात आली. 

सील केल्यानंतर या कार्यालयाकडून थकीत करापोटी कराच्या रकमेचा धनादेश देऊन पुढील पंधरा दिवसांत उर्वरित कराची रक्कम जमा करीत आहोत, असे लेखी पत्र दिले. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत रक्कम जमा करण्याच्या अटीवर व शासकीय कार्यालय असल्याने कारवाई पुढील पंधरा दिवसांसाठी स्थगित करण्यात आली, अशाप्रकारची शासकीय कार्यालयांची महापालिकेकडे थकबाकी आहे त्या कार्यालयांवर सीलबंदची कारवाई करण्याबाबत नोटीस दिलेली आहे. तसेच न्यायालयीन प्रकरण होऊ नये म्हणून कॅव्हेट दाखल केलेले आहेत. तेव्हा शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांनी त्यांची थकबाकी जमा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर निर्धारक व संग्राहक यांनी केले आहे.

यावेळी कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जप्ती पथकप्रमुख कर अधीक्षक राहुल लाड, रमेश गायकवाड, विजय मिरजे, महेंद्र कडोकर, तसेच वसुली लिपिक संजय भोसले, प्रमोद कांबळे, सनी सरनाईक हे सर्व कर्मचारी कारवाईमध्ये सहभागी होते.    

तसेच ज्या मिळकतधारकांना थकबाकीची अंतिम नोटीस लागू करण्यात आल्या आहेत. अशा थकबाकीधारकांवर सीलबंदची/प्रॉपर्टीवर बोजा नोंद करण्याची कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सीलबंदची मोहीम इथून पुढे कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी आपला घरफाळा भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागामार्फत करण्यात आलेे आहे.