Thu, Jul 18, 2019 12:29होमपेज › Kolhapur › विरोधकांचे मिशन २०१९ संपवा

विरोधकांचे मिशन २०१९ संपवा

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 02 2018 11:39PMमुदाळतिट्टा  प्रतिनिधी

कागल विधानसभा मतदार संघाच्या सर्व निवडणुका अटीतटीच्या झाल्या आहेत. आगामी 2019 मध्ये होणारी विधान सभेची निवडणूक मिशन फत्ते  करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे  व विरोधकांचे मिशन 2019 उधळून लावावे असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून केले.   मुरगूड (ता. कागल) येथे मुरगूड शहर व बोरवडे, चिखली , कापशी अशा तीन जिल्हा परिषद मतदार संघातील मतदार नोदणी संदर्भात आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.  ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह पाटील अध्यक्षस्थानी होते.
आ. मुश्रीफ म्हणाले, आमदार हाळवणकर आमच्या खासदारांना मंत्री  करतो म्हणून आमंत्रण देत आहेत.

ज्यांना स्वतःला मंत्री  होता येत नाही ते खासदारांना मंत्री करणार असे बोलत आहेत.   यावेळी प्रवीणसिंह पाटील म्हणाले, शिवानंद माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, दलितमित्र डी. डी. चौगुले, निवृती गोते, सरपंच शीतल फराक्टे यांची भाषणे झाली. यावेळी समरजितसिंह घाटगे व संजय घाटगे गटातून विलास पाटील, राजेंद्र गायकवाड, प्रकाश गोते, सोपान मेंगाने, प्रवीण पाटील, दिलीप वडर, संदीप हवलदार, संतोष वडर, पंडित कमळकर (मळगे बु) प्रकाश रेडेकर (आणुर) अमोल नरतवडे, राजाराम  बागडी, अविनाश शिरोळे, (लिंगनूर)शिवाजी ना. पाटील, प्रल्हाद कांबळे (मळगे खु) सर्जेराव पाटील, विजय पाटील, पांडुरंग पोवार, साताप्पा कांबळे, (सोनगे) आनंदा गुरव (निढोरी) यांनी आमदार हसन मुश्रीफ गटात प्रवेश केला. यावेळी  जि. प. सदस्य  मनोज फराक्टे, नविद मुश्रीफ, प्रा. डी. डी. चौगले,  रमेश तोडकर,  शामराव घाटगे आदीं मान्यवरांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक  विकास पाटील यांनी केले.आभार रणजित  सूर्यवंशी  यांनी 
मानले.   

 नौ कोटी का रेडा, दो कोटी का कोंबडा

खा. महाडिक यांच्यावर टीका करताना आ. मुश्रीफ म्हणाले, नौ कोटी का रेडा और दो कोटी का कोंबडा. झूकती है दुनिया झुकाने वाला चाहीए! तुम्हाला निवडून आणलं, त्याची जाणीव नसेल; पण आता होऊन जाऊ द्या जनताच फैसला करेल असे म्हणताच उपस्थितात टाळ्यांचा कडकडाट झाला.