Tue, Nov 20, 2018 01:11होमपेज › Kolhapur › खेळाडूंना घडविण्यात मातांचे मोठे योगदान

खेळाडूंना घडविण्यात मातांचे मोठे योगदान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यांत बहुतांश माता चूल आणि मूलपर्यंत मर्यादित असल्याचे दिसते. मातांचे सहकार्य व पाठबळामुळेच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे. खेळाडूंना घडविण्यात मातांचे मोठे योगदान राहिले आहे, असे गौरवोद‍्गार जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी काढले.

क्रीडामहर्षी अशोक दुधारे यांच्या संकल्पनेतून व कोल्हापूर फेन्सिंग (तलवारबाजी) असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांच्या राष्ट्रमाता जिजाऊ क्रीडा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. वाघमारे म्हणाले, कोल्हापुरात खेळाचे वातावरण असून विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना आईची साथ मिळाल्याने ते घडले आहेत. कोल्हापुरातील 23 जण शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शासनाच्या वतीने खेळाडूंना शिक्षणासह नोकरीत प्राधान्य मिळते. ग्रामीण भागातील खेळाडूंना पुढे आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत.याप्रसंगी पेठवडगावच्या माजी उपनगराध्यक्षा प्रविता सालपे, विक्रम पाटील, हंबीरराव पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विनय जाधव यांनी प्रास्ताविक केले. दीपक क्षीरसागर यांनी सूत्रसंचलन केले. प्रफुल्ल धुमाळ यांनी आभार मानले. यावेळी सोनाली पुजारी, स्मिता अनगळ, दीपा शहा, एम. डी. घुगरे आदी उपस्थित होते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Mothers, huge, contributions, players


  •