Sat, Mar 23, 2019 12:41होमपेज › Kolhapur › ‘भिशी’च्या नावाखाली सावकारी

‘भिशी’च्या नावाखाली सावकारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडित्रे : प्रतिनिधी

जनमानसातून पतसंस्थांची उतरलेली प्रतिमा, कारखान्यानी थकवलेली एफ.आर.पी. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. मटका, गुटखा आणि हातभट्टी यांच्याबरोबर खासगी सावकारांनी धुमाकूळ घातला आहे. सावकारीला ‘भिशी’ या गोंडस नावाखाली कर्जदारांची लुबाडणूक करणार्‍या ग्रामीण भागातील या सावकारांना चाप लावण्याची गरज आहे.

शहरी नागरिकांपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या गरजा वेगळ्या आहेत. ऊस बिलाची अपुरी रक्कम आणि केवळ दुधावर संसार चालवता येत नसल्यामुळे कर्जाची हमखास गरज लागते. सहकारी चळवळीतील संस्थात्मक कर्जपुरवठ्याचे अनेक मार्ग ग्रामीण भागात उपलब्ध असले तरी  सावकारच  शेतकर्‍यांना जवळचा वाटतो. सोसायटी, पतसंस्था यांनी मानच टाकल्यामुळे आणि दुधातूनही फारसे काही हाताला लागत नसल्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर सावकारांचा आश्रय घेतात. त्याच्याकडून विनातारण व विनाकारण कर्ज मिळते. कागदपत्राचीही व्यवस्था करावी लागत नाही.

ग्रामीण भागातील या सावकारांनी आपली एक कार्यपद्धती विकसित केली असून, भिशीचे  नेटवर्क सुरू केले आहे. गावातील किंवा त्या भागातील एखादा भिशीधारक गावातील श्रीमंत कूळ गाठून त्यांच्याकडून 3 ते 4 टक्के (मासिक) दराने दरमहा वर्गणी गोळा करतो व अशी जमा झालेली रक्कम गरजूंना 7 ते 10 टक्के (मासिक) व्याजाने दिली जाते. दर महिन्याला व्याज द्यावे लागते. काही वेळा कर्ज देतानाच पुढील व्याज आगावू कापून घेतले जाते. मुद्दल मुदतीअखेर भरावे लागते. दिवाळीदरम्यान यांचे इअरएंडिंग असते.

सोसायटीची फिरवाफिरवी, गणपती, दसरा, दिवाळी आणि लग्नसराईत यांची ‘सुगी’ असते. सर्वसाधारणपणे पतसंस्था किंवा सोसायट्यांचा वर्षअखेरीस कर्जदारांकडे तगादा लागतो. अशावेळी हे सावकार सावज हेरून जाळ्यात ओढतात. सचिवाशीही यांचे कनेक्शन असते. भिशीचे हे डायरेक्टर त्याला बकरा करून जाळ्यात गुरफटतात. काही वेळा सोसायटीची क. म. मर्यादा फूल झालेली असते आणि लग्नकार्य निघते आणि सावकाराचा पाश पडतो. 

 

URL : kolhapur district, Moneylender bigness  


  •