Mon, Apr 22, 2019 23:40होमपेज › Kolhapur › मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:32AM

बुकमार्क करा
कळे : वार्ताहर 

विद्यामंदिर बाजारभोगाव (ता. पन्हाळा) शाळेतील इयत्ता सहावीमध्ये शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थिनीचा नांदारी धरण (ता. शाहूवाडी) येथे वनभोजनासाठी गेल्यावर शाळेच्या मुख्याध्यापकाने विनयभंग केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.  

याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने बुधवारी कळे पोलिसांत दिली. यानुसार मुख्याध्यापक पी. टी. चौगले याच्याविरोधात गुन्हा दाखल करून शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
अधिक तपास शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करीत आहे.