Thu, Nov 15, 2018 20:53होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिर परिसरात मॉक ड्रीलचा थरार

अंबाबाई मंदिर परिसरात मॉक ड्रीलचा थरार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ बेवारस बॅग सापडली...सुरक्षारक्षकांनी याची माहिती पोलिस मुख्यालयात कळविली... काही मिनिटात बॉम्बशोध पथकासह श्‍वानपथक घटनास्थळी दाखल झाले... बॅगेची तपासणी घेत एका संशयितालाही पकडले... हा थरारक प्रसंग भाविकांनी बुधवारी सायंकाळी अनुभवला. निमित्त होतं मॉक ड्रिलच.

अंबाबाई मंदिर परिसराची सुरक्षितता तपासण्याच्या हेतूने तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पोलिस दलातर्फे प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. जोतिबा रोड व पूर्व दरवाजासमोर एका बेवारस बॅगची बॉम्बशोध पथकाने तपासणी केली. तसेच श्‍वान पथकाच्या मदतीने बॅग ठेवणार्‍या संशयिताचा शोध घेतला. अर्थात हा संशयितही पोलिस कर्मचारीच होता. प्रात्यक्षिकाच्या निमित्ताने मंदिराची सुरक्षितता, सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षारक्षकांमध्ये जागृती या उद्देशाने प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आल्याचे पोलिस दलातर्फे सांगण्यात आले. शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक अनिल गुजर, दहशतवाद विरोधी पथकाचे सय्यद यांच्यासह कर्मचारी यामध्ये सहभागी झाले. .

Tags : Kolhapur, Kolhapur News, Mock, drill, tremor,  Ambabai temple, area


  •