Tue, Jul 23, 2019 04:04होमपेज › Kolhapur › दिवसातून अडीच हजार वेळा होतो मोबाईलला स्पर्श

दिवसातून अडीच हजार वेळा होतो मोबाईलला स्पर्श

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 1:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

माणसाला एखाद्या गोष्टीची इतकी सवय होती की ती व्यक्‍ती त्याशिवाय राहूच शकत नाही. सध्या मोबाईल वेड्यांबाबत सोशल मीडियावरून अनेक गमतीशीर क्‍लिप आपणास पहावयास मिळतात. या मोबाईलच्या दैनंदिन सरासरी वापराबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्व्हेमध्ये एक व्यक्‍ती दिवसातून मोबाईलला पाचशे, हजारवेळा नव्हे तर तब्बल 2500 वेळा स्पर्श करत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

एका कंपनीने परराष्ट्रीय कंपनीने याबाबत नवीन अ‍ॅप तयार केले असून, हे अ‍ॅप आपल्या मोबाईलचा वापर दर्शवत असते. गेल्या वर्षी अमेरिकेतील एका बँकेने एकूण मुलांच्या संख्येपैकी सुमारे निम्मी मुले स्मार्टफोनशिवाय जगू शकत नसल्याचे जाहीर केले आणि मोबाईलच्या अतिवापराची चर्चा सुरू झाली. सुरुवातीच्या काळात मोबाईल फोनच्या किमती आणि त्यांच्या कॉल्सचे दर पाहिल्यानंतर मोबाईल सर्वसामान्यांच्या हातात येतील असे वाटत नव्हते. ही वस्तू श्रीमंतांपुरतीच मर्यादित राहील अशी चर्चा होती. मात्र, मोबाईल कंपन्यांमध्ये आपला विस्तार वाढविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा इतकी तीव्र होती की त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांनाही झाला. टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आला नसता तरी कॉल्स आणि नेटचे पॅक सध्या आहे त्यापेक्षाही आणखी कमी किमतीत मिळाले असते. मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेमुळे झोपडपट्टीतही त्याला युजर मिळाले आणि  त्याचा परिणाम सर्वांच्या हातात मोबाईल दिसू लागले.

मोबाईलचे वेड सध्या इतके वाढले आहे की तासन्तास काही मुले मोबाईलमध्ये डोकी घालून बसलेली असतात. यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये सरासरी व्यक्‍ती दिवसात 85 वेळा त्यांचे डिव्हाईस तपासते. सामान्य फोन वापरकर्ता रोज आपल्या फोनला 2 हजार 617 वेळा स्पर्श करतो. मात्र, हे प्रमाण सरासरी वापरकर्त्यांवर आधारित आहे. अती फोन वापरणार्‍यांचे फोनला स्पर्श करणार्‍यांची संख्या त्यापेक्षा अधिक आहे. या अभ्यासाच्या आधारे  एका कंपनीने फोनला आपण कितीवेळा स्पर्श करतो हे दर्शविणारे अ‍ॅप तयार केले आहे. काही लोकांना उगाचच खिशातून फोन काढण्याची सवय असते. फोन काढतात आणि न पाहताच ते परत ठेवून देतात असे कितीवेळा एखादी व्यक्‍ती करते हे देखील या अ‍ॅपद्वारे समजते.