Fri, Jul 19, 2019 01:04होमपेज › Kolhapur › अबब! मिरची @ 650 रुपये

अबब! मिरची @ 650 रुपये

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:32AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

गडहिंग्लज कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये आज मिरचीच्या सौद्यामध्ये 650 रुपये किलो इतका उच्चांकी दर झाला असून, हसूरवाडी (ता.गडहिंग्लज) येथील लिगोंडा रामगोंडा देसाई यांच्या मिरचीला जब्बार ट्रेडर्सने हा उच्चांकी दर दिला आहे. मिरची सौदा हा मुसळे यांच्या अडत दुकानामध्ये झाला.

गडहिंग्लजच्या बाजार समितीमध्ये मिरचीच्या सौद्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दरामध्ये प्रचंड वाढ झाली असून, येथील शेतकर्‍याच्या मिरचीला उच्चांकी दर मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या मिरचीला 650 रुपये प्रतिकिलो इतका भाव मिळाला असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी मिरची इतक्या दरापर्यंत पोहोचली नव्हती. या सौद्यावेळी राजन जाधव, रोहित मांडेकर, भरतकुमार शहा, महेश मोर्ती, अरविंद आजरी, विश्‍वनाथ चोथे, बी. एस. पाटील, श्रीकांत येरटे यांच्यासह अन्यजण उपस्थित होते.