होमपेज › Kolhapur › लग्‍नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्‍नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 12:08AMराधानगरी : प्रतिनिधी

धामोड (ता.राधानगरी)येथे अल्पवयीन मुलीस लग्‍नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार पिडीत मुलीच्या वडिलांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली. आरोपी सूरज गोरख कराळे (वय 20, रा. धामोड, ता. राधानगरी) याला अटक करून दिवाणी न्यायालयासमोर उभे केले असता 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली. 

पिडीत मुलीस सूरज कराळे याने या मुलीस नऊ महिन्यांपासून माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगून तीन ते चार वेळा शारीरिक संबंध ठेवले आहेत. अल्पवयीन मुलगी असूनसुद्धा सूरज कराळे या तरुणाने सोमवारी रात्री आपल्या मोटारसायकलवरून नेऊन धामोड धरण शेजारील रिकाम्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला असल्याची तक्रार पिडीत मुलीच्या वडिलांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली आहे. अल्पवयीन मुलीस लग्‍नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा गुन्हा राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल झाला असून पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, कॉन्स्टेबल पी. बी. गोजारे, के. डी. लोकरे अधिक तपास करीत आहेत.