Tue, Apr 23, 2019 09:55होमपेज › Kolhapur › अल्पवयीन मुलीस सुरीचा धाक दाखवून बलात्कार; एकास अटक

अल्पवयीन मुलीस सुरीचा धाक दाखवून बलात्कार; एकास अटक

Published On: May 03 2018 1:41AM | Last Updated: May 03 2018 12:46AMगारगोटी : प्रतिनिधी

बेगवडे येथील अल्पवयीन मुलीस सुरीचा धाक दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी भुदरगड पोलिसांनी सुनील शिवाजी सुतार (वय 27, रा. धामणे, ता. आजरा) याला अटक केली. भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. 

सुनील सुतार हा मामाच्या गावी बेगवडे येथे राहतो. तेथील सातवीच्या वर्गात शिकत असणार्‍या शाळकरी मुलीस सुरीचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी त्याने बलात्कार केला. पीडित मुलीच्या आई- वडिलांनाही जीवे मारण्याची त्याने धमकी दिली. सुनील सुतार याच्या त्रासाला कंटाळून मुलीला बाहेरगावी शिकण्यास पाठवले होते. त्या ठिकाणीही जाऊन तो तिला वारंवार त्रास देत असे.

19 एप्रिल रोजी पुन्हा त्याने अल्पवयीन मुलीच्या घराशेजारील अंगणात जाऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केला असता तिचे कपडे फाडले व जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. मात्र, त्याचा मामा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सुतारला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सुतारवर भुदरगड व गोकुळ शिरगाव पोलिसांत विविध गुन्हे नोंद आहेत.