Wed, Jan 23, 2019 07:04होमपेज › Kolhapur › कौशल्य विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करा

कौशल्य विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करा

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 14 2018 1:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी

डोंगरी भागात राहणार्‍या अनुसूचित जमातीतील लोकांमध्ये अनेक अंगभूत कला असतात. अशा लोकांचे कौशल्य विकास करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी केले. 

विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री भगत  सोमवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. मंगळवारी सकाळी त्यांनी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत काम करणार्‍या कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अधिकार्‍यांची बैठक कोल्हापुरात घेतली. आदिवासींसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी  संजय शिंदे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी सोनकवडे उपस्थित होते.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या पाच जिल्ह्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या 5,04,652 इतकी आहे. आदिवासी विकास विभागातर्फे डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना, प्री. मॅट्रिक स्कॉलरशिप, नामांकित इंग्रजी शाळांमधून अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण, एकलव्य मॉडेल स्कूल, विविध घरकूल योजना, पंडित दीनदयाळ स्वयंयोजना आदी योजना राबवल्या जातात. या योजनांना निधी दिला जातो. यातून योजना राबविल्या जातात, या सर्वांची माहिती मंत्री भगत यांनी घेतली. तसेच आदिवासी विभागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणावे, असेही त्यांनी सांगितले.