Thu, Jan 24, 2019 18:13होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर म्‍हणजे स्‍त्री शक्‍तीचं ऊर्जा केंद्र : मेघना एरंडे

कोल्‍हापूर म्‍हणजे स्‍त्री शक्‍तीचं ऊर्जा केंद्र : मेघना एरंडे

Published On: Mar 09 2018 7:56PM | Last Updated: Mar 09 2018 7:56PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्‍हापूर हे अंबाबाई मातेचं शहर आहे. यामुळे स्‍त्री शक्‍तीचं ऊर्जा असणारे शहर असल्याचे डबिंग आर्टिस्‍ट मेघना एरंडे यांनी सांगितले.

पुढारी वृत्त समूहच्या कस्तुरी क्लबतर्फे An Inspiration कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट, अभिनेत्री मेघना एरंडे यांनी आपल्या आवाजाची दुनिया कस्‍तुरीच्या सभासदांना उलघडून दाखवली. 
कोल्‍हापूर शहर हे स्‍त्री शक्‍तीचे उर्जाकेंद्र आहे. अंबाबाई मातेचं शहर असल्याने येथील स्‍त्रिया आदिशक्‍तीच्या वारसरदार आहेत. कोल्‍हापूरातील महिलांकडून मिळणारी शाबासकी हिच खरी माझी ऊर्जा असल्याचे डबिगं आर्टिस्‍ट मेघना एरंडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये मेघना एरंडे यांनी आपल्या आवाजाचा प्रवास सर्वांना आपल्या आवाजातूनच करून दाखवला. यावेळी त्यांनी अभिनेत्री माधुरी दिक्षीत, करिश्मा कपूर, हेमामालिनी, करिना यांचे आवाजही काढून दाखवले. डिझ्ने, नॉडी,सिंचान आदी कार्टुनच्या आवाजांचीही झलकही उपस्‍थितांना पाहता आली.