होमपेज › Kolhapur › उद्योजकांच्या समस्याविषयी फेब्रुवारीत बैठक 

उद्योजकांच्या समस्याविषयी फेब्रुवारीत बैठक 

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:06PMउजळाईवाडी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी व त्यावर कोणत्या प्रकारे तोडगा काढता येईल यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्योजकांच्या संघटनेसोबत बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे महसुल सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. शनिवारी गोशिमा कार्यालयास सदिच्छा भेटी प्रसंगी उद्योजकांनी विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला या प्रसंगी ना. पाटील बोलत होते.

ई. एस. आय. हॉस्पिटल चालू करणे बाबत, उद्योग विस्तारासाठी नवीन भूखंड व वेस्ट मटेरियल टाकणेसाठी जागा, वीज दरवाढ कमी करणे, औद्योगिक वसाहतींना विना खंडित पाणी पुरवठा करणे, विमान सेवा त्वरीत सुरु करणे, गोकुळ शिरगाव औद्योगीक वसाहतीतील मुख्य रस्त्याचे उड्डाणपुल रुंद करणे, औद्योगिक वसाहतीतील कचरा निर्मूलन करणे, फौंड्री क्लस्टरसाठी झालेला दंड माफ करणे, अतिक्रमण काढे, तसेच औद्योगिक संघटना सोबत वर्षात किमान एकादी संयुक्त बैठक घेणेत यावी अशा मागणीचे निवेदन ना. पाटील यांना गोशिमाचे अध्यक्ष सुरजितसिंग पवार यांनी दिले. 

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी उद्योजकांचे प्रतिनिधी व शासकिय संबंधित अधिकारी यांच्यासोबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

या बैठकीस गोशिमाचे अध्यक्ष सुरजितसिंग पवार, उपाध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, एस. एस. पाटील, आर. पी. पाटील, जे. आर मोटवाणी, सचिन शिरगावकर, चंद्रकांत पाटील, उदय दुधाणे, मोहन मुल्हेरकर, विश्‍वजित कुलकर्णी आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.